Ad will apear here
Next
स्त्रियांसाठी योगा + दातांची सुरक्षा
रोजच्या कामांच्या यादीत स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला स्त्रियांना वेळ मिळत नाही आणि अखेर वयाबरोबर शारीरिक दुखणी सुरू होतात. ते टाळण्यासाठी घरच्याघरी योगाभ्यास उपयुक्त ठरतो. डॉ. विद्या दामोदर मोरे (डोंगरे) यांनी या पुस्तकात योगासने, प्राणायाम, मुद्रा आणि बंध यांची आकृत्यांसह सोप्या भाषेत माहिती दिली आहे. पूर्वतयारी, साधे व्यायाम, सूर्यनमस्कार, विविध आसने आदी कसे करावे हे त्यातून समजते. 

दात हे आपल्या तोंडाचे आरोग्य राखण्यासाठी मदत करतातच, शिवाय एकूणच शरीराचे आरोग्य दातांवर अवलंबून असते. डॉ. विजय तारे यांनी ‘दातांची सुरक्षा’ या पुस्तकात दातांची काळजी कशी घ्यावी, यासंबंधी मार्गदर्शन केले आहे. प्रारंभी त्यांची दातांची रचना समजावून सांगितली आहे. त्यानंतर दातांचे आजार, हिरड्यांचे आजार, दातांचे दुखणे, मोडणे आदींची माहिती दिली आहे.

प्रकाशक : वरदा प्रकाशन
पाने : २०२
किंमत : १८० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZOVBN
Similar Posts
संपूर्ण पंचतंत्र प्राचीन भारतीय लोककथांचा हा सर्वाधिक लोकप्रिय संग्रह मानला जातो. या संग्रहातील सत्तराहून अधिक लोककथा पाच भागांत विभागल्या आहेत. पंचातंत्रांची रचना शास्त्रविमुख राजपुत्रांना नीतिशास्त्रज्ञ बनविण्यासाठी झाली आहे. मूळ संस्कृतमध्ये असलेल्या या पंचातंत्राचा ह. अ. भावे यांनी केलेला हा अनुवाद आहे. लोकसाहित्याचे अभ्यासक रा
छत्रपती शिवाजी महाराज महाप्रतापशाली शिवाजी महाराज यांच्या अतुलनीय पराक्रमाचे विस्तृत वर्णन कृ. अ. केळुसकर यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या चरित्रलेखनातून केले आहे. या चरित्राची पहिली आवृत्ती १९०६मध्ये प्रसिद्ध झालेली आहे. याची नववी आवृत्ती वाचकांसाठी सध्या उपलब्ध आहे.
सम्राट अशोक चरित्र सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी भारतात आपले आधिपत्य निर्माण करून इतिहास अजरामर झालेला सम्राट अशोक हा राजा होऊन गेला. त्याने फक्त राज्यच केले असे नाही, तर त्याने जनतेला धर्मज्ञान, सदाचार, भूतदया या गुणांची शिकवण दिली. प्रजेने या तत्त्वांवर चालावे अशी आशा त्याने केली आणि तसा प्रयत्न आयुष्भर केला.
ट्रेझर आयलँड कुमारवयीन मुलांसाठी मराठीमधून लेखन करणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे बहुतांश मुले इंग्रजीतील साहित्याकडे वळत असल्याच्या पार्श्वभूमीवर विलास फडके यांनी लिहिलेले हे पुस्तक वेगळे ठरावे. नकाशाच्या साह्याने दुर्गम आयलँडवर स्वारी करायला निघालेला नायक जीम हॉकिन्स, धाडसी कॅप्टन अन् त्याच्या सहकाऱ्यांची ही कथा आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language